ललित पाटील प्रकरणात आता 'ससून'चे होणार चेकअप

............

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2023-11-23 11:31:34

पुणे : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ललित पाटीलवर ससून रुग्णालयात उपचार करणारे वरिष्ठ डॉक्टर, लेक्चरर, एक्स रे तज्ञ आदी कर्मचाऱ्यांची चौकशी सध्या सुरू आहे. ससून रुग्णालयात मोठी कारवाई होण्याची शक्यता असून, डॉ. संजीव ठाकूर व त्यांच्या पथकातील डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. जर ते दोषी आढळल्यास पुणे पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले जात आहे. पुणे पोलिसांनी आता ससूनवर लक्ष केंद्रीत केले आहे.