छत्रपती संभाजी नगर येथे आयकर विभागाची कारवाई; २०० अधिकाऱ्यांची पथके नियुक्त
............
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2023-11-30 10:42:21

छत्रपती संभाजी नगरः येथे गुरुवार ३० नोव्हेंबरच्या पहाटेपासून आयकर विभागाने छापेमारीला सुरुवात केली आहे. शहरातील अनेक मोठ्या व्यावसायिकांच्या कार्यालयात व घरावर छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाने ही कारवाई करण्यासाठी २०० अधिकाऱ्यांची पथकं नियुक्त केली आहे. कर चुकवल्याने ही कारवाई झाल्याचे म्हटले आहे. कारवाईतील बांधकाम व्यावसायिकांची नवे अद्यापही अस्पष्ट आहे.