उपमुख्यमंत्री पवार यांचा संभाजीनगरचा दौरा रद्द

............

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2023-12-02 11:49:47

 मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार २ डिसेंबर रोजी संभाजीनगरचा दौरा करणार होते. मात्र आता हाती आलेल्या बातमीनुसार, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री पवार आज  छत्रपती संभाजीनगर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार होते.