Chhattisgarh Assembly Election २०२३ : छत्तीसगडमध्ये भाजपचीच सत्ता येणार ?
...
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2023-12-03 11:52:56

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्यात ७ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुकांचे २ टप्प्यात मतदान झाले. छत्तीसगड विधानसभेचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ रोजी समाप्त होत आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ९० जागा असून, राज्यात सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला ४६ जागांची आवश्यकता असते. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात राज्यातील २० नक्षलग्रस्त जागांवर ७ नोव्हें. रोजी मतदान झाले. १७ नोव्हेंबर रोजी उर्वरित ७० विधानसभा जागांवर मतदान झाले.गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या.भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले होते.
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व भाजप नेते रमण सिंह यांनी आजचा दिवस छत्तीसगडसाठी महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे. आपले सरकार स्थापन होणार आहे. हे मला माहीत होते. येथे भाजपचीच सत्ता असल्याचे निश्चित झाले आहे. भूपेश बघेल यांना राज्यातील जनतेने नाकारले आहे.
छत्तीसगड विधानसभा निकाल- 2023
भाजप-48
काँग्रेस-38
इतर-1
एकूण जागा: 90
बहुमत: 46
छत्तीसगड विधानसभा निकाल- 2023
भाजप-50
काँग्रेस-38
इतर-2
एकूण जागा : 90
बहुमत : 46