रुंगटा हायस्कूलमध्ये ६ डिसेंबर रोजी व्याख्यानाचे आयोजन

..

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2023-12-03 12:15:36

एकलहरे - नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुंगटा हायस्कूलमध्ये संस्थेचे माजी शिक्षक भैयाजी काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पूर्वांचलमधील कामाचा परिचय व्हावा, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारी मंडळ सदस्य सुहासराव हिरेमठ यांचे बुधवार दि.६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले आहे.