Telangana Assembly Election Result : जाणून घ्या एक क्लिकवर

..

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2023-12-03 13:46:35

दिल्ली - दि.3 डिसेंबर रोजी 4 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत असून, यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. तेलंगणात काँग्रेसने बाजी मारत बीआरएसला मागे रेटले. मुख्यमंत्री केसीआर यांच्या हातातून सत्ता निसटून जात आहे. दुपारी साडेबारा वाजता हाती आलेल्या कलांनुसार, तेलंगणात काँग्रेस ६५ जागांवर आघाडीवर, केसीआर यांचा बीआरएस ४०, भाजप ९ इतर ६ जागांवर आघाडीवर आहे. 

 

परिवर्तन- तेलंगणा निवडणुकीच्या प्रचारात परिवर्तनाचा मुद्दा खुपच गाजला. सरकारच्या विरोधात हल्लाबोल झाल्याने आता राज्यात बदल हवा आहे, अशी एक लाट तयार झाली. काँग्रेसने त्या लाटेवर स्वार होत स्वतःला परिवर्तनाचं साक्षीदार केलं. २५ टक्के मतदारांनी परिवर्तनासाठी मतदान केल्याचे एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर स्पष्ट झाले.  

घोटाळ्यांचे आरोप- भाजप व काँग्रेसने केसीआर यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले. व कौटुंबिक सरकार म्हणून हिणवले. केसीआर कुटुंबासाठी सरकार चालवतात असा आरोप त्यांच्यावर झाला. त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसत आहे.

मुस्लिम मतदार- तेलंगणा राज्यातील ४० पेक्षा जास्त मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. एकीकडे भाजपने थेट मुस्लिम आरक्षण काढून घेण्याची भूमिका जाहीर केली होती. दुसरीकडे काँग्रेसने मुस्लिमांसाठी विविध योजना जाहीर करुन एक प्रकारे संरक्षण देण्याच्या घोषणा केल्या. त्यामुळे काँग्रेसकडे मुस्लिम मतदार आकर्षित झाले.

एमआयएम फॅक्टर- एमआयएमस मुस्लिमांचा पक्ष म्हणतात. तरी एमआयएमला मतदान म्हणजे भाजपला फायदा, असे सूत्र मागच्या काही वर्षांपासून तयार झालं. त्यामुळे भाजपचा फायदा करुन देण्यापेक्षा थेट काँग्रेसला साथ देणं मुस्लिम मतदारांनी पसंद केलं.

बीआरएस भाजपची बी टीम- बीआरएसचा भाजपची बी टीम असल्याची टीका काँग्रेसने केली होती. प्रत्येक सभेत भाजपने केसीआर यांना टार्गेट करताना भाजपशी संबंध जोडले. त्यामुळे मुस्लिम मतदार बीआरएसपासून दूरावला गेला. त्याचा फायदा काँग्रेसला झाला.