Rajasthan assembly elections Result :राजस्थानात सत्ताबदल; भाजप आघाडीवर
..
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2023-12-03 14:04:55

दिल्ली - राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी मतदान पार करण्यात आले. काँग्रेस उमेदवाराच्या निधनाने करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली आहे. विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ५ कोटी २५ लाख ३८ हजार १०५ मतदारांनी मतदान पेटीत बंद केले. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला १०० ते ११०, काँग्रेसला ९०-१०० जागा, अपक्ष यांना ५-१० 5 जागा मिळतील असेही एक्झिट पोल सांगत आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोतविरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध काँग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहे. राजस्थानात समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत आहे.
राजस्थानमधील प्रमुख नेत्यांपैकी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, वसुंधरा राजे आघाडीवर आहे.गेल्या 3 दशकांपासून सुरू असलेला सत्ता परिवर्तनाचा ट्रेंड राजस्थान विधानसभा निवडणुकीतही कायम आहे. पूर्ण राज्यातील काँग्रेस व भाजपच्या यशस्वी उमेदवारांचा आलेख पाहिल्यास लक्षात येतं ते म्हणजे, काँग्रेसबाबत विश्लेषक ज्या भीतीचं भाकीत करत होते, तेच घडलं आहे. पायलटांकडं दुर्लक्ष करणं काँग्रेसला महागात पडलं आहे. राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 110 - 115 जागांवर आघाडीवर आहे.
टोंकमध्ये सचिन पायलट १९ हजार १६५ मतांनी पुढे
मतमोजणीची 13वी फेरी पूर्ण
टोंक जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार 2 जागांवर तर भाजपचे उमेदवार 2 जागांवर आघाडीवर
उदयपुरवाटी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शुभकरन चौधरी ९ हजार मतांनी आघाडीवर
त्याचवेळी काँग्रेसमधून बडतर्फ झालेले नेते व आता शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गुढा दुसऱ्या क्रमांकावर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला 10 फेऱ्यांत 10 हजार मतसुद्धा प्राप्त झाली नाही. भाजपविरोधात बंडखोरी करणाऱ्या चंद्रभान सिंग आक्याचा आकडा 50 हजारांवर गेला आहे.
अपक्ष चंद्रभान सिंग आक्या : 47508
काँग्रेसचे सुरेंद्र सिंह जाधवत : 43194
भाजपचे नरपत सिंग राजवी : 9192
निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार, राजस्थानमध्ये भाजप 102 जागांवर आघाडीवर