Rajasthan Vidhan Sabha Result : राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री राजे विजयी

..

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2023-12-03 14:29:40

दिल्ली -  राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागांसाठी मतदान पार करण्यात आले. काँग्रेस  उमेदवाराच्या निधनाने करणपूर विधानसभेची निवडणूक पुढं ढकलली आहे. विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य ५ कोटी २५ लाख ३८ हजार १०५ मतदारांनी मतदान पेटीत बंद केले.  

 

राजस्थानमधील ३ जागांचे निकाल स्पष्ट : त्यापैकी २ जागा भाजपने तर १ जागा भारत आदिवासी पार्टीने जिंकली आहे.

झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार वसुंधरा राजे 103010 मतांनी विजयी

2003 पासून त्या या जागेवरून विजयी होत आहे.

 2018 मध्ये त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेते मानवेंद्र सिंह यांचा पराभव करत 54 टक्के मते मिळवली.