इंस्टाग्रामने केले उर्फी जावेदचे अकाउंट सस्पेंड
..
Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2023-12-03 15:14:44

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद ही कायमच आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर तिचे अनेक व्हिडिओ,फोटो व्हायरल होत असतात.कधी तिच्या बेताल वक्तव्यामुळे उर्फीची चर्चा होतेच. मात्र आता उर्फीला मोठा झटका मिळाला आहे. उर्फी जावेदबाबत एक बातमी समोर आली आहे.
जावेदने अलीकडेच एक इस्टास्टोरी शेअर करून चाहत्यांना सांगितले की, तिचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केले आहे.उर्फी जावेद अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर करून खळबळ उडवून देत असते. मात्र आता इंस्टाग्रामने तिचे अकाउंट सस्पेंड केल्याने काही नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहीना वाईट देखील वाटल आहे.