चारित्र्याच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या
..
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2023-12-03 15:34:55

नाशिक -परसूल येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. सविस्तर माहितीनुसार,परसूल येथील भाऊसाहेब बरकले (वय३५) व पत्नी सुनीता (वय ३०) यांच्यात नेहमी वाद होत असे.
भाऊसाहेब सुनीताच्या चारित्र्यावर सतत संशय घेत.१ डिसेंबर रोजी दुपारी त्यांच्यात असाच वाद झाल्याने त्यातून भाऊसाहेबने सुनीताचा खून केला. घटनेचा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी भाऊसाहेबने तिच्या तोंडात विषारी औषध ओतले. आणि तिच्या आत्महत्येचा बनाव केला.
यानंतर भाऊसाहेबने स्वतः आत्महत्या केली. या घटनेबाबत पोलिसपाटील सोनाली सोनवणे यांनी माहिती दिल्याने चांदवड पोलिसांत अकस्मात मृत्यूंची नोंद झाली होती. घटनेसंदर्भात पोलिसांनी मृताच्या घरच्यांची, नातेवाइकांची चौकशी केल्यावर भाऊसाहेब सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याची माहिती लताबाई ठाकरे (५०, उमराणे शिवार, परसूल) यांनी पोलिसांनी दिली. ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बरकलेविरोधात गुन्हा दाखल केला.