चार्जिंग स्टेशन फेरनिविदेत सहा कंपन्या स्पर्धेत

.........

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

 नाशिक : महापालिका विद्युत विभागाने पहिल्या टप्प्यात वीस चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी राबवलेल्या फेरनिविदेत सहा कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. या निविदा उघडून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, त्यात कंपन्या पात्र ठरल्या नाहीत, तर पुन्हा फेरनिविदा काढावी लागेल. 

मागील वेळेस निविदा प्रक्रियेतील सातही कंपन्या तांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्या होत्या. शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत.याकरिता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी दिल्ली येथील यूएनडीपीने देशातील प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. 

त्यात नाशिक महापालिकेचा समावेश असून, शहर हद्दीत तब्बल १०६ चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात वीस ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी मागील एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यात प्रारंभी टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते, पण नंतर त्यांनी माघार घेतली. पहिल्या निविदा प्रक्रियेत सात कंपन्य‍ा सहभागी झाल्या होत्या. दीड महिना या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.