करंजाड येथे रुद्र पूजा

.................

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

पिंगळवाडे - आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री.श्री. रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे श्रावण महिन्यात भारतभर ठिकठिकाणी वेग  ही पूजा होत आहे. याच अनुषंगाने करंजाड, भुयाने या दोन्ही गावांनी हा संयुक्त कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय, करंजाड येथे दि. ८सप्टेंबर रोजी झाली. 

कार्यक्रमात साधारण ६१ जोडप्यांनी  सहभाग घेतला.या पूजेचे पौराहित्य बंगलोर इथून आलेल्या चार महंतांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कपिल देवरे, जितेंद्र देवरे, युवराज देवरे, काकाजी शेवाळे, दिलीप शेवाळे, अनिल शेवाळे,प्रकाश शेवाळे, रवींद्र शेवाळे यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर उपस्थित नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 कार्यक्रमासाठी संदीप शेवाळे, अनिल शेवाळे, अधिक देवरे, किशोर देवरे, शांताराम देवरे, माणिक रौंदळ, शशिकांत पाटील,उमेश देवरे, अतुल कापडणीस, स्मिता पवार,प्रियंका देवरे यांचे सहकार्य लाभले.