ऐंशी हजारांचा गुटखा जप्त
.............
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

मालेगाव ः ग्रामीण पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून ८० हजार ५०१ रुपयांचा गुटखा जप्त केला. यावेळी गुटखा बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले.
यात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने नवा आझादनगर भागातील सैलानी चौकातील गल्लीत छापा टाकला. या कारवाईत खलिल अहमद निहाल अहमद याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून ४७ हजारांचे विमलचे शंभर बॉक्स, सहा हजार ८६४ रुपयांचे २०८ पुडे व्ही१ तंबाखू, असा एकूण ५३ हजार ८५४ रुपयांचा गुटखा जप्त केला. उपनिरीक्षक विधाते तपास करत आहेत. दुसरीकडे, आझादनगर पोलिसांनी गट नं. ३ मधील ८०९ नंबरच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरात विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला २६ हजार ६३७ रुपयांचा गुटखा आढळला.