समाज संघटन ही काळाची गरज- दाभाडे

..........

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

  नाशिक - सुवर्णकार समाजाचे संघटन होत त्यात ऐक्यभाव निर्माण होऊन तो वृद्धिंगत व्हावा ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संत नरहरी युवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शामकांत दाभाडे यांनी केले. श्री संत नरहरी सोनार युवा फाऊंडेशन ग्रुपचा पदग्रहण व शाखा उद्घाटन सोहळा कै. सुमनशेठ सोनार सभागुह शहादा येथे नुकताच झाला. त्या प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. जीवन जगदाळे, प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष शामकांत दाभाडे, आचार्य के.बी. रणधीर, मोहन सोनार (शहादा अध्यक्ष लाड सुवर्णकार समाज), सोमेश्वर सोनार (शहादा अध्यक्ष वैश्य सुवर्णकार समाज), तुषार सोनार, मनोज घोडके, संदीप विसपुते, शैलजा रणधीर, सतीश हिंगोलीकार, नारायण आडगावकर, विजय दाभाडे, सुनीता सोनार, निलेश भामरे, सुनीता सोनार, लोटन भामरे, माधव विसपुते, मयूर अहिरराव, किशोर दाभाडे, रामचंद्र चव्हाण, लक्ष्मण सोनार, देविदास सोनवणे, अभय वाघ, पूनम सोनार, भावना सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
शहादा तालुका कार्यकारणी गठीत करत तालुकाध्यक्षपदी देविदास बन्सीलाल सोनवणे, महिला तालुकाध्यक्ष भावना नितीन वडनेरे तर शहादा शहर कार्यकारणीत शहादा शहर अध्यक्ष अभय अंबादास वाघ, महिला तालुकाध्यक्षपदी पूनम लक्ष्मण सोनार यांची संस्थापक अध्यक्ष यांच्या कडून निवड करण्यात आली. जिल्हा कोअर कमेटी अध्यक्ष म्हणून रामचंद्र हिरामण चव्हाण, जिल्हा संघटक म्हणून सोमेश्वर सोनार यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमासाठी जळगाव, धुळे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला आणि नंदुरबार येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  योगेश सोनार यांनी तर प्रस्तावना दिपक दुसाणे यांनी केली. सोनवणे यांनी उपस्थतितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज रनाळकर, नितीन वडनेरे, संजय विसपुते, राजेंद्र चव्हाण, प्रकाश दाभाडे, आनंदराव विसपुते, ईश्वर चव्हाण, प्रकाश चव्हाण, मुरलीधर विसपुते, निलेश देवपूरकर, पंकज सोनार, शाम सोनार, मनोज बिरारी, योगेश अहिरराव, वैभव सोनार आदींनी परिश्रम घेतले.