शहरासह ग्रामीण भागात आज बत्ती गुल
................
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

नाशिक रोड : नाशिक जिल्ह्याच्या काही भागांतील बत्ती गुल राहणार आहे. मनोरा उभारणीचे काम सुरू राहणार असल्याने विजेच्या समस्येचा सामना त्या-त्या भागांतील नागरिकांना करावा लागणार आहे. महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून शहरातील काही भाग, तसेच ग्रामीण भागाला वीजपुरवठा केला जातो.
शहरातील सामनगाव, जेलरोड, भारत प्रतिभूती मुद्रणालय, सिडको, अंबड, पाथर्डी, चुंचाळे, उपनगर, गणेशवाडी , पंपिंग, मेरी, तपोवन, गंगापूर, सातपूर, आडगाव, क्रीडा संकुल, मखमलाबाद, म्हसरूळ या भागांचा त्यात समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील चांदोरी, ठाणगाव, वावी, नांदुरी, नायगाव, विजयनगर , सिन्नर, दापूर, सोनांबे, गोपूर, ओझर, टाउनशिप, जऊळके, आंबे हिल, दहावा मैल, जानोरी, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, वाडीवऱ्हे, नवदुर्गा, तेलवाणे, खंबाळे, उमराळे, ननाशी, मुंगसरा, म्हाळसाकोरे, करंजगाव, खेडगाव, सुकेणे, पिंपळस (रामाचे), नैताळे, कोकणगाव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, भोपेगाव, कोशिंबे, कोऱ्हाटे, तळेगाव या गावांतही याच उपकेंद्रातून वीजपुरवठा होताे.
शहरासह ग्रामीणमधील या भागांना दोन दिवस विजेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. शनिवारी (दि. ९) पहाटे पाचपासून ते रात्री आठपर्यंत या भागात वीज गायब राहणार आहे. तसेच रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे त्या-त्या भागांतील कामे विजेवाचून अडणार आहेत.
या दोन दिवसांत मनोरा उभारण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने संबंधित भागात वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे. वेळेआधी काम पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.