करंजाड उपबाजार समितीत शुकशुकाट
...........
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00
पिंगळवाडे : तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार समिती आवारात बेमुदत लिलाव बंदमुळे पूर्णपणे शांतता व शुकशुकाट होता. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के केल्याने जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारीवर्ग यांनी संयुक्तपणे केंद्र सरकारचा निषेध सुरू ठेवला आहे. त्याअनुषंगाने नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत करंजाड उपबाजार समितीचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, यावेळी समितीला व्यापारी वर्गानेसुद्धा आपल्या जवळ असलेला माल बाहेरील राज्यांत विक्रीसाठी न काढता कांदा चाळीतच पडून आहे. यावेळी परराज्यातून येणारे ट्रक मोठ्या संख्येत उभ्या होत्या. तर बाजार समितीत फक्त हमाल, मापारी, सहसचिव व रखवालदार एवढेच लाेक उपस्थित होते. संबंधित व्यापारी वर्गाकडे जे मजूर रोजंदारीने काम करतात त्यांच्यावर या संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे. तसेच शेतकरी वर्गाचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.