रोहित पवार अजित पवारांची जागा घेत आहे : मुश्रीफ
.............
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 0000-00-00 00:00:00
मुंबई - राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार गटातील कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुंबईत मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते.
रोहित पवार हे सध्या ‘साहेबांचा संदेश’ या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचा दौरा करत आहे. आज ते कोल्हापुरात आहे. यावेळी त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. १९९८ मध्ये मुश्रीफ यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह असूनही, शरद पवार यांनी विरोध डावलून मुश्रीफ यांना संधी दिली.
मात्र आता एमआयडीसीत मुश्रीफ यांचे पदाधिकारी व नातेवाईक अडचणी निर्माण करत आहे. असे रोहित पवार म्हणाले. यावर मुश्रीफ यांनी या आरोपाला प्रत्युत्तर देत रोहित पवार राजकारणात नवीन आहे. त्यांना शरद पवार गटात आता अजित पवार यांची जागा घ्यायची आहे.
कशासाठी ते एवढे धाडस करत आहे. कोल्हापुरात ६ आमदार होते, आता कमी झाले. पुण्यात देखील तीच परीस्थिती आहे. आरोपाला जागा नसल्याने ते असे काहीही आरोप करतात. मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता हे जाहीर सांगावे. मंडलीक तर माझ्याच बरोबर होते, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
कोल्हापुरात २५ ऑगस्ट रोजी शरद पवार जाहीर सभा घेत आहे. यावर मुश्रीफ म्हणाले, पवारांनी एवढ्या छोट्या मैदानात यायला नको होते. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याच आमच्या त्यांना शुभेच्छा आहे.