कोरोना घोटाळा प्रकरण : बिरादार आज आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर
...............
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 0000-00-00 00:00:00
मुंबई - कोरोना काळात झालेल्या बॉडीबॅग घोटाळा प्रकरणात बीएमसीचे तत्कालीन उपआयुक्तांची आज २६ ऑगस्ट रोजी चौकशी करण्यात येणार आहे. या घोटाळ्यात पालिका अधिकारी रमाकांत बिरादार आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोप आहे. कोरोना काळात २ हजार मूल्य असलेली बॉडीबॅग ही ६ हजार रुपयांना विकली जात होती. मूळ किंमतीपेक्षा जास्त किमतीला या बॅग विकल्याचा आरोप करण्यात आला आहे.