पॅरिस फॅशन वीकमध्ये आलिया-ऐशचा रॅम्पवॉक

आलिया पहिल्यांदा सहभागी

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-09-24 18:36:03

अल्पावधीतच विविध भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाद्वारे साकारणारी आलिया भट ही लग्नानंतर आणि त्यातही बाळंतपणानंतर कितपत आणि कशी इंडस्ट्रीत टिकून राहते? याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. मात्र आलियाने राहाच्या जन्मानंतर लगेचच  तिचा अभिनय, मॉडेलिंगवर संपूर्ण फोकस केल्याचे दिसून येतेय. तिचे चित्रपट रिलीज होताय. भूमिका प्रेक्षकांना पूर्वीइतक्याच आवडताहेत. तिचा जिगरा हा सिनेमा लवकरच येतोय. पण आज आलिया चर्चेत येण्याचे कारण तिचा चित्रपट नसून तिचा रॅम्पवॉक आहे. कारण पॅरिस फॅशन वीकमध्ये आलियाने पहिल्यांदाचा हजेरी लावली आहे. एका ब्रॅण्डसाठी आलियाने हा रॅम्पवॉक केला. विशेष म्हणजे ब्लॅक सूटमधील आलियाचा लूक सगळ्यांनाच आवडला. आलियाच्या एकंदरीतच लूकवर चाहते खुश होते. आलियाबरोबरच ऐश्वर्या राय देखील पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली आहे. ऐश्वर्याने गडद लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्पवॉक केला.  आपले वय, बोटोक्स सर्जरीनंतर चेहऱ्याची बदललेली ठेवण सांभाळण्याचा प्रयत्न ऐश्वर्याच्या ड्रेसमधून दिसून येतो. ऐश्वर्या अनेक वर्षांपासून नियमितपणे या फॅशन वीकमध्ये हजेरी लावत आली आहे.