एकतर्फी प्रेमातून झाली महालक्ष्मीची हत्या

गुढ उलगडले ; आरोपीची आत्महत्या

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-09-27 12:44:11

बंगळुरु:- येथील महालक्ष्मी  ( २९ ) फ्रीज हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले आहे. या हत्याकांडातील प्रमुख आरोपी मुक्तीरंजन राय याने आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या हत्याकांडाची उकल झाली आहे. या चिठ्ठीत मुक्तीरंजन याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आपण हत्या केल्याची माहिती आईला देखील दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. 

बंगुळूरु येथील महालक्ष्मी ( २९ ) या महिलेची  निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे तब्बल ३० पेक्षा जास्त तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. सुरुवातीला महालक्ष्मीच्या पहिल्या पतीने   महालक्ष्मीचा मित्र अशरफ यावर संशय व्यक्त केला होता. नंतर पोलिस तपासात मुक्तीरंजन हे नाव समोर आले होते. 

आरोपी मुक्तीरंजनचा  मृतदेह ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील भुईनपूर गावाजवळ झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मला महालक्ष्मी खूप आवडत होती. माझे तिच्यावर खूप प्रेम होतं. मात्र, ती माझ्याशी अजिबात नीट वागत नव्हती. महालक्ष्मी मला अपहरणाच्या प्रकरणात अडकवू पाहात होती. मी तिच्यासाठी खूप पैसे खर्च केले. मात्र, तिला माझी कदर नव्हती. त्यामुळे मी तिची हत्या केली.” अशी कबुली मुक्तीरंजनने त्याच्या सुसाईड नोटमध्ये दिली आहे. 

आत्महत्येपूर्वी आईजवळ देखील गुन्ह्याची कबुली

आरोपी मुक्तीरंजन रायच्या आईने माहिती देताना सांगितले की,‘ तो मंगळवारी रात्री १० वाजता घरी आला होता. मात्र, तो तणावग्रस्त दिसत होता, म्हणून मी त्याला कारण विचारलं होतं. त्यानंतर त्याने चूक केली असे तो म्हणाला.  त्याने सांगितले की, बेंगळुरूमध्ये एका महिलेची हत्या केली. जिथे तो उदरनिर्वाहासाठी राहत होता.  पीडितेने आरोपीकडून पैसे आणि आणि सोन्याची चैन घेतली होती. त्याने पंधरवाड्यापूर्वीच हा गुन्हा केला होता. मात्र, जेव्हा त्याने मला या घटनेबद्दल सांगितले तेव्हा मी थक्क झाले. त्यानंतर तो झोपी गेला आणि पहाटे ४ वाजताच्या सुमारास पोलीस तपासामुळे कुटुंबावर परिणाम होऊ नये म्हणून आपण निघून जात असल्याचं सांगितले.’