अदनान सामी यांच्या आईचे निधन

पोस्ट शेअर करीत दिली माहिती

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-07 15:12:29

मुंबई :  प्रसिद्ध गायक अदनान सामी  यांच्या आई बेगम नौरीन यामी यांचे ( ७७ )   निधन झाले आहे.   अदनान सामी  यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर  आईच्या निधनासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमध्ये त्यांनी आईच्या फोटोखाली  १९४७  ते २०२४ असे लिहून माझी प्रिय आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाची अत्यंत दु:खाने मी घोषणा करत आहे. आम्ही दु:खात बुडालो आहोत. ती एक अविश्वसनीय स्त्री होती, जिने तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला प्रेम आणि आनंद मिळायचा. आम्हाला तिची खूप आठवण येईल.   दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करा.  अल्लाह आमच्या प्रिय आईला जन्नत-उल-फिर्दौसमध्ये आशीर्वाद देवो… आमिन…”. असे सामी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

अदनान सामी यांच्या आईच्या निधनाचे वृत्त कळताच  अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.