गहू, हरभरा, मोहरी, जवस,मसूराच्या हमीभावात वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-16 16:46:54

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये, गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांची वाढ, तर मोहरीच्या हमीभावात 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.  केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेट बैठकीत लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्यासाठी देखील मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वीच केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीत डीए आणि डीआरमध्ये 3 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. महागाई भत्ता वाढवण्यात आला असून तो 1 जुलै 2024 पासून लागू असेल.  

विविध पिकांच्या हमीभावात झालेली वाढ पुढीलप्रमाणे :- 

1. गहू - 150 रुपयाची वाढ, आता 2 हजार 475 रूपये क्विंटल हमीभाव .2. मोहरीच्या किंमतीत - 300 रुपयांची वाढ, आता 5 हजार 950 रूपये क्विंटल हमीभाव.  3. जवसाच्या किंमतीत 130 रुपयांची वाढ,आता 1 हजार 980 रूपये क्विंटल हमीभाव . 4. हरभऱ्याची किंमतीत - 210 रुपयाची वाढ ,  5 हजार 650 रूपये क्विंटल हमीभाव. 5. मसूराच्या किंमतीत 275 रुपयांची वाढ,  आता 6 हजार 700 रूपये क्विंटल हमीभाव . 6. करडईच्या किंमतीत 140 रुपयाची वाढ,  आता 5 हजार 940 रूपये क्विंटल हमीभाव. 

 दरम्यान ,  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्वांनी संपन्न असा मोफत तांदूळ देण्याच्या योजनेला वाढ देण्यात आली आहे. सन 2028 ही पर्यंत ही मोफत तांदूळ योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.