न्या. संजीव खन्ना होणार नवे सरन्यायाधीश

मा.धनंजय चंद्रचूड होणार निवृत्त

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-18 12:10:47

नवी दिल्ली : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होणार आहेत. त्यांनी देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. 
        सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नियुक्ती ज्येष्ठताक्रमाने केली जाते. सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचे प्रमुख असतात. ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती व देशातील विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस करतात. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दोन वर्षे त्यांच्या पदावर राहिल्यानंतर सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती खन्ना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. पुढील सहा महिन्यांनंतर १३ मे २०२५ रोजी ते निवृत्त होतील. जानेवारी २०१९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून ते रुजू झाले होते. त्यांच्यासमोर कंपनी कायदा, मध्यस्थता, सेवा कायदा, सागरी कायदा, नागरी कायदा आणि वाणिज्यिकविषयक कायदा यासंदर्भातील प्रकरणे आहेत. न्यायमूर्ती खन्ना सर्वोच्च न्यायालयात खंडपीठात होते. ९० पेक्षा अधिक निर्णय त्यांनी दिले. २०२३ मध्ये शिल्पा शैलेमध्ये संविधान पीठाचा निर्णय दिला. यूओआ विरुद्ध यूसीसी प्रकरणात न्यायमूर्ती खन्ना होते. या प्रकरणात भोपाळ गॅस दुर्घटना पीडितांना अतिरिक्त मदतीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय दिला होता.