लग्नाच्या १२ वर्षांनंतर राधिका होणार आई

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-18 13:36:19

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे लग्नाच्या १२ वर्षांनंतर आई होणार आहे. राधिका  नुकतीच  बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सिस्टर मिडनाइट’ सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित होती.यावेळी ती गरोदर असल्याचे सर्वांना माहीत झाले. यामुळे तिच्या चाहत्यांना गोड धक्का बसला. या सोहळ्याचे काही फोटो राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरदेखील शेअर केले आहेत. यात गर्भवती असलेली राधिका काळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. गर्भारपणातील तेज राधिकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तिचा हा प्रेग्नन्सी लूक सध्या व्हायरल होत आहे. राधिकाने ही गुड न्यूज दिल्यानंतर बॉलिवूडमधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिने सन २०१२ मध्ये ब्रिटिश व्हायोलिनवादक आणि लोकप्रिय संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी विवाह केला होता. सन २०११ मध्ये बेनेडिक्ट व राधिकाची एकमेकांशी ओळख झाली होती. त्याने ते दोघेही एकत्र राहिले. पुढे २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले.