‘हिंदुत्व’ बदलण्याची मागणी फेटाळली
याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-22 13:03:13
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठात सोमवारी (दि. २१) हिंदुत्व हा शब्द बदलण्याची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त करत या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला.
हिंदुत्व या शब्दाऐवजी भारतीय संविधान हा शब्द वापरण्याची मागणी करणारी याचिका डॉ. एस. एन. कुंद्रा यांनी दाखल केली होती. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि न्यायमूर्ती ननोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली व खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, हा प्रक्रियेचा पूर्ण दुरुपयोग आहे. आम्ही त्यावर विचार करणार नाही.