जया बच्चन यांना मातृशोक

इंदिरा भादुरी यांचे निधन

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-10-23 16:39:50

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचे  भोपाळमध्ये( ९४ )   निधन झाले आहे.   काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.  त्यांच्यावर उपचार सुरू होते.   वयोमानानुसार प्रकृती खालावल्यामुळे इंदिरा भादुरी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

 आजीची प्रकृती खालावल्याचे समजताच अभिषेक बच्चन मंगळवारी रात्री उशिरा भोपाळमध्ये दाखल झाला. अभिषेक आणि श्वेता बच्चन त्यांच्या आजीच्या खूप जवळ होते. अभिषेक पाठोपाठ जया बच्चन देखील भोपाळमध्ये पोहोचल्या. आता उर्वरित बच्चन कुटुंबीय मुंबईहून भोपाळला रवाना होणार आहे .जया बच्चन यांचे आई-वडील मध्य प्रदेशातच दीर्घाकाळापासून वास्तव्यास होते. जया बच्चन यांचाही जन्म मध्य प्रदेशात झाला. जया बच्चन यांना   नावे रीटा आणि नीता  या दोन बहिणीही आहेत.