सुनीता विल्यम्सकडून अंतराळातून दिवाळी शुभेच्छा
व्हाइट हाउसमध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रम
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-10-30 13:01:51
नवी दिल्ली ः ‘नासा’मधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) व्हिडिओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्हाइट हाउसमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा व्हिडिओ दाखविण्यात आला. यात त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही काढली. त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आभारही मानले. सुनीता विल्यम्स या दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत.
विल्यम्स म्हणाल्या, की अंतराळ स्थानकावरून मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. यंदा मला पृथ्वीपासून २६० मैल दूर अंतराळात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी व इतर सण साजरे करण्यास तसेच आपली सांस्कृतिक मूल्ये जपण्यास शिकवले. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे. त्या म्हणाल्या, की व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचेही आभार मानते. ५ जून रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग स्टारलायनरच्या