अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पोस्कोन्वये गुन्हा

Written by लोकनामा ऑनलाईन गुन्हेगारी 2024-11-09 13:15:27

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : शिळ्या पोळ्या टाकण्यासाठी घराबाहेर पडलेल्या १४ वर्षीय मुलीचे एकाने लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाइकाच्या घरात घेऊन जात संशयिताने हे कृत्य केले. त्यास पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            भुऱ्या ऊर्फ ऋषिकेश अनिल गरुड (वय २३, रा. मनपा शाळेजवळ, अश्वमेधनगर, पेठ रोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली. पीडिता बुधवारी (दि. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास शिळ्या पोळ्या घराबाहेर टाकण्यासाठी गेली असता, ही घटना घडली. संशयिताने तिला गाठून नजीकच्या आपल्या मावशीच्या घरात नेले. याठिकाणी विनयभंग करत संशयिताने तिच्याशी अंगलट केली. बराच वेळ उलटूनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केल्याने हा प्रकार समोर आला. पोलिसांनी तत्काळ संशयितास अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करत आहेत.