सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा..!
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2024-11-09 16:46:38
देशप्रेम, देशभक्ती ही काही औरच चीज आहे. ती काही प्रमाणात संस्कार, अनुकरण यातून येते, तर काही प्रमाणात मात्र ती उपजतच असावी लागते. देशप्रेम, देशभक्ती ही बाब वय, लिंग, जात, धर्म, सधन, निर्धन यावर मात्र अजिबात अवलंबून नसते. ही बाब वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त करता येते. काही वेळा प्रत्यक्ष देशासाठी सैनिक होऊन लढून, देशाचे संरक्षण करून दाखविता येते, तर काही वेळा देशाची काळजी घेऊन जपणूक करणारे सुजाण नागरिक होऊनही ती दिसते. काही वेळा उत्स्फूर्त मोठमोठी भाषणे देऊन व्यक्त करता येते, तर कधी मनातून त्या भावना गीताच्या रूपात उमललेल्या, फुललेल्या दिसतात. मग ती गीतं वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या आपल्या मनावर राज्य करतात, कायम ओठी आणि स्मरणात राहतात.
९ नोव्हेंबर म्हणजे अशाच एका देशप्रेमाने प्रेरित झालेल्या गझलकाराचा जन्मदिवस. त्यांचं नाव आधी सांगितलं तर कदाचित ओळख पटणार नाही, पण व्यक्तीचे कार्य ही त्याची ओळख बनली तर ती व्यक्ती महान बनते. अशाच एका अप्रतिम, मनाचा ठाव घेणाऱ्या, देशाप्रति वाटणाऱ्या कौतुकामुळे लिहिल्या गेलेल्या लोकप्रिय गीताच्या गीतकाराची आज जयंती. ते गीतकार म्हणजे, मोहम्मद अल्लामा इक्बाल. ते गीत म्हणजे, 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा.'
मोहम्मद इक्बाल यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले हे देशभक्तीचे काव्य असून, उर्दू भाषेतील गझल या काव्यप्रकारात हे गीत रचण्यात आलेले आहे. १६ ऑगस्ट १९०४ रोजी इत्तेहाद नावाच्या साप्ताहिकात हे गीत प्रथम प्रकाशित झाले होते. इक्बाल हे लाहोरच्या शासकीय महाविद्यालयात प्राध्यापक असताना त्यांचा विद्यार्थी लाला हरदयाल याने त्यांना एका कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले. त्यावेळी अध्यक्षीय भाषण करण्याऐवजी भारतीयांची संस्कृती बिंबविणारे हे गीतच सर्वांना गाऊन दाखविले. भारत, पाकिस्तान म्हणजे तत्कालीन ब्रिटिश भारत, बांगलादेश अशा सर्व ठिकाणी या गीताचा प्रसार झाला. परंतु भारतात हे गीत विशेष लोकप्रिय झाले.
भारतीय सैन्याच्या संचलनात या गीताच्या सुरावटीवर संचलन केले जाते. आजही हे गीत ऐकताना, म्हणताना अंगावर मूठभर मांस चढल्याचा गौरवास्पद फील येतोच येतो. हे संपूर्ण गान आपल्या वाचण्यासाठी खालीलप्रमाणे...
सारे जहाँ से अच्छा
हिन्दोसिताँ हमारा
हम बुलबुलें हैं इसकी
यह गुलसिताँ हमारा
ग़ुर्बत में हों अगर हम,
रहता है दिल वतन में
समझो वहीं हमें भी
दिल हो जहाँ हमारा
परबत वह सबसे ऊँचा,
हम्साया आसमाँ का
वह संतरी हमारा,
वह पासबाँ हमारा
गोदी में खेलती हैं
इसकी हज़ारों नदियाँ
गुल्शन है जिनके दम से
रश्क-ए-जनाँ हमारा
ऐ आब-ए-रूद-ए-गंगा!
वह दिन हैं याद तुझको?
उतरा तिरे किनारे
जब कारवाँ हमारा
मज़्हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम, वतन है
हिन्दोसिताँ हमारा
यूनान-ओ-मिस्र-ओ-रूमा
सब मिट गए जहाँ से
अब तक मगर है बाक़ी
नाम-ओ-निशाँ हमारा
कुछ बात है कि हस्ती
मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन
दौर-ए-ज़माँ हमारा
इक़्बाल! कोई महरम
अपना नहीं जहाँ में
मालूम क्या किसी को
दर्द-ए-निहाँ हमारा !
-कल्याणी बापट (केळकर) ९६०४९४७२५६.