ॲड. ढिकलेंचे काम हीच विजयाची पावती ठरेल: सानप

जेल रोड येथे प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-14 13:41:07

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक : गेल्या पाच वर्षांत ॲड. राहुल ढिकले यांनी केलेले काम तुमच्यासमोर आहे अन् मीही केलेले काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्याने ढिकले विजयी होणार, हे निश्चित आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.
         नाशिक पूर्व मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲड. राहुल उत्तमराव ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जेल रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाले. यावेळी महायुतीचे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व इतर घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जेल रोड येथील विविध संघटना, तसेच पक्षांच्या मान्यवरांनी अॅड. ढिकले यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत केले. माजी आमदार बाळासाहेब सानप अध्यक्षस्थानी होते. 
         व्यासपीठावर विजय साने, मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, प्रकाश लोंढे, संजय भालेराव, रामबाबा पठारे, भारत निकम, समीर शेख, संतोष कांबळे, शशीभाई उन्हवणे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, अनिता सातभाई, सूर्यकांत लवटे, उद्धव निमसे, विशाल संगमनेरे, शरद मोरे, रमेश धोंगडे, राजेश आढाव, संभाजी मोरुस्कर, पंडित आवारे, शिवाजी भोर आदी उपस्थित होते. आमदार ढिकले यांच्या नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक विकासकामांचा आढावा मान्यवरांनी घेतला.
           याप्रसंगी मंगेश मोरे, सचिन हांडगे, राहुल बेरड, आप्पा नाठे, संदीप पाटील, प्रवीण पवार, सचिन सिसोदे, दिनेश नाचण, सुरेखा निमसे, कुंदा सहाणे, राहुल गायकवाड, शंतनु निसाळ, कृष्णा बोराडे, अमोल बोराडे, आदित्य ढिकले, सुयश पागेरे, स्वप्नील कातोरे, विजय भिशे, मतेश जडगुले, सागर लखन, योगेश रसाळ, कपिल खर्जुल, यतीश ठाकूर, महेश पवार, सुमित चव्हाणके, सागर कड, राहुल कोथमिरे, योगेश कपिले, दिनेश अहिरे आदी उपस्थित होते.

 पुन्हा संधी द्या

गेल्या वेळी आम्ही दोघे एकमेकांविरोधात लढलो, पण आज दोघेही एकत्र आहोत. त्यामुळे राहुल ढिकले यांनी चांगले काम केल्याने त्यांना पुन्हा संधी दिली पाहिजे. मी गेली तीस वर्षे विविध पदे भूषवली आहेत. आम्ही दोघे वरिष्ठांना भेटायला मुंबईला गेल्यानंतर आम्ही त्यांना एकच सांगितले की, दोघांपैकी ज्याला उमेदवारी द्याल त्याला निवडून आणण्याचे काम करू. आता राहुल ढिकले उत्तर महाराष्ट्रातून एक नंबरने विजय होणार यात शंका नाही.
- बाळासाहेब सानप, माजी आमदार