नाशिक विभागात नवीन लालपरी दाखल

'टाटा'च्या चेसीसवर कार्यशाळांत एसटी बसची बांधणी

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-14 15:36:43

लोकनामा प्रतिनिधी

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या छ. संभाजीनगर, दापोली व हिंगोली या मुख्य कार्यशाळांत एमएस बॉडीच्या बस बांधणीचे काम सुरू होते. ही बस अर्ध्या सफेद व अर्ध्या लाल रंगात तयार होत होती.           

      या बस अशोक लेलँड कंपनीच्या चेसीसवर बांधण्यात येत होत्या. आता त्या 'टाटा'च्या चेसीसवर बांधण्यात येत आहेत. त्या पूर्ण लाल रंगातच राहणार आहेत. त्यामुळे लालपरीचा सफेद रंग हद्दपार होईल. या नवीन बस नाशिक विभागात दाखल झाल्या आहेत. काही वर्षांपासून नवीन चेसीस उपलब्ध होत नसल्याने जुन्याच चेसीसवर बसबांधणी सुरू आहे. आतापर्यंत या चेसीस अशोक लेलँड कंपनीच्या होत्या. त्यावरील बसबांधणी थांबवण्यात आली आहे. आता चिखलठाणा (छ. संभाजीनगर) येथील कार्यशाळेत 'टाटा'च्या चेसीसवरच बसची बांधणी करण्यात येणार आहे. या चेसीस जुन्या जरी असल्या, तरी त्या टाटाच्या वापरण्यात येत आहेत.                

  दरम्यान, एमएस बॉडीची बस ही लाल व सफेद रंगात होती. आता ही बस पूर्णपणे लाल रंगातच आहे. तिचे आगमन नाशिक विभागात झाले आहे.  टाटाच्या चेसीसची फ्रेम मोठी आहे. अशोक लेलँड कंपनीच्या चेसीस लांबीला जास्त, पण रुंदीला कमी होत्या, तर 'टाटा'च्या चेसीसची रुंदी जास्त आहे. या फरकामुळे केवळ चाकांच्या दोन्ही अंतरात तफावत राहील. दोन्ही चेसीसमध्ये एवढाच काय तो फरक असला, तरी केवळ 'टाटा'च्या चेसीसवर बसबांधणी करण्याच्या सूचना आहेत.नाशिक आगारात सेवेस रुजू'टाटा'च्या चेसीसवरील बसबांधणी होऊन ती पूर्णपणे तयार होण्यास १२ ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. यापूर्वी दोन ते चार दिवसांत एक बस बांधून पूर्ण होत होती. टाटाच्या चेसीसवर नुकतीच बसबांधणी पूर्ण झाली असून, ती नाशिक आगारात सेवेसाठी मंगळवारी (दि. १२) दाखल झाली आहे.

नाशिक आगारात सेवेस रुजू

'टाटा'च्या चेसीसवरील बसबांधणी होऊन ती पूर्णपणे तयार होण्यास १२ ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. यापूर्वी दोन ते चार दिवसांत एक बस बांधून पूर्ण होत होती. टाटाच्या चेसीसवर नुकतीच बसबांधणी पूर्ण झाली असून, ती नाशिक आगारात सेवेसाठी मंगळवारी (दि. १२) दाखल झाली आहे.