सिंहस्थासाठी गणेश गिते विधानसभेत हवेत
पंचवटीत मतदारांचा निर्धार, झंझावाती प्रचाराला प्रतिसाद
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-11-16 13:56:18
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक:नाशिक पूर्वचे उमेदवार गणेश गिते पंचवटीत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी येऊन त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत. पंचवटीच्या विकासासाठी, सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी गणेश गिते यांना संधी देण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश बबन गिते यांनी पंचवटीत प्रचाराचा धडाका लावला आहे. पंचवटीतील दत्तनगर येथून प्रचारास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या धुळे येथील खासदार डॉ. शोभा बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला आहे. साधू-महंत व भाविकांना दळणवळण, पाणीपुरवठा, निवास, आरोग्य, विद्युत व्यवस्था पुरविणे, तसेच कायदा- सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात पंचवटीत विविध विकासकामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे विकासपुरुष अशी उपाधी असलेल्या गणेश गिते यांना निवडून देण्यासाठी पंचवटीकरांनी त्यांना साथ देण्याचे ठरविले आहे. नाशिकची ओळख मंत्रभूमी अशी आहे. पंचवटी हे नाशिकमधील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रासह देशातून भाविक भेटी देतात. त्यामुळे पंचवटी भागात विकासकामे होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी गणेश गिते यांचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या अनुभवाच्या जोरावर पंचवटीत विविध कामे होण्यासाठी ते सर्व प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे विधानसभेत गिते यांना निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वत्र त्यांचा प्रचार करत आहेत.
मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा पूर्णपणे प्रयत्न ते करत आहेत. विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. यात गिते यांचा हातखंडा आहे. हीच त्यांची जमेची बाजू असून, ते पंचवटीत विकासगंगा आणून पंचवटीचा विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील, असे महाविकास आघाडीचे पदाधिकारी सांगत आहेत.
याठिकाणी झाला दौरा ...
या दौऱ्यात दत्तनगर, शिंदेनगर, कुमावतनगर, जाणता राजा कॉलनी, सुदर्शन कॉलनी, शनि मंदिर, नवनाथनगर, रोहिणीनगर, नवरंग परिसर, इंद्रकुंड, दिंडोरी नाका, मार्केट यार्ड, श्रीरामनगर, लोक सहकारनगर, चित्रकूट सोसायटी, मायको हॉस्पिटल, कालिकानगर, तेलंगवाडी, तीन मंदिर व मधला परिसर, रॅन्बो व्यायामशाळा, फुलेनगर, पाटावरचा परिसर, वज्रेश्वरीनगर, तारवालानगर परिसर, लामखेडे मळा परिसर, तुळजाभवानीनगर, हरिओमनगर परिसर, समर्थनगर परिसर, अवधूत कॉलनी (मंडलिक मळा) येथे नागरिकांच्या भेटी घेऊन गणेश गिते यांनी त्यांच्याशी संवाद साधला.