शंभर लोकांसाठी असायचे एकच स्वच्छतागृह

मीनाक्षी शेषाद्रीने शेअर केल्या आठवणी

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-16 15:50:12

अभिनेत्री माधुरी दीक्षत, भाग्यश्री, अमिताभ, शाहरुख, आमिर, आलिया यांसारख्या स्टार कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन एखाद्या बंगल्यापेक्षा कमी नाहीत. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा या त्यांच्या व्हॅन नेहमीच चर्चेत असतात. मात्र, पूर्वी व्हॅनिटी व्हॅन ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. कलाकार शूटिंगच्या ठिकाणी खुर्च्या टाकून एखाद्या छत्रीखाली किंवा झाडाखाली बसलेले असायचे. या काळातील संघर्ष हेलनपासून साधनासारख्या अभिनेत्रींनी अनेकदा बोलून दाखवला आहे. अशाच आठवणी मीनाक्षी शेषाद्री यांनीही शेअर केल्या आहेत.    मीनाक्षीने एका मुलाखतीत सांगितले की, सेटवर जवळपास ५०-१०० लोक एकच स्वच्छतागृह वापरायचे. पुरुष व महिलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे नसायची. “काही स्टुडिओंमध्ये फक्त एकच स्वच्छतागृह असायचे. ५० ते १०० लोक एकच स्वच्छतागृह वापरायचे. त्यामुळे वेगळे शौचालय नसायचे. फॅन्सी ड्रेसेस घातल्यावर शौचालय वापरताना खूप काळजी घ्यावी लागायची, असे ती म्हणाली. एक रोमँटिक गाणं तिला पावसात शूट करायचं होतं आणि तिला अतिसार झाला होता. तो शूटिंगचा सर्वांत वाईट दिवस होता. त्या परिस्थितीतही मी अभिनय करत होते, असे मीनाक्षीने पुढे सांगितले.  दरम्यान, जया बच्चन यांनीही मध्यंतरी शौचालये नसल्यामुळे महिला कलाकारांना आउटडोअर शूटच्या वेळी झाडाझुडपात जाऊन सॅनिटरी पॅड बदलावे लागायचे, अशी परिस्थिती होती असे म्हटले होते.   हेलन, आशा पारेख  यांनी देखील भर उन्हात  एसी शिवाय आम्ही काम करत होतो, असे सांगितले आहे.