अभिनेत्रींना मूळ रूपातच स्वीकारले पाहिजे

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-16 15:53:21

मध्यंतरी वाढलेल्या वजनामुळे विद्या बालनसारख्या अभिनेत्रीला खूप टीकाटिप्पणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ती खचली होती. अशाच प्रकारचा अनुभव अनेक अभिनेत्रींना मायानगरीत येतो. आपले करिअर वाचविण्यासाठी अनेक जणी असंख्य प्रकारच्या शस्त्रक्रिया करतात.   दरम्यान, हुमा कुरेशीलाही तिच्या शरीरयष्टीमुळे मिळणाऱ्या भूमिकांवर होत असलेला परिणाम सहन करावा लागला आहे.  मात्र, तिने अत्यंत उपयुक्त, मार्गदर्शक अनुभव नुकताच शेअर केला आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर मी एका कॉफी शॉपमध्ये डेव्हिड धवन यांना भेटले. त्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी मला सांगितले, ‘बेटा, तू खूप चांगली अभिनेत्री आहेस. तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण असे काहीही करू नकोस. प्रेक्षकांनी तुला स्वीकारलं आहे, त्याचे महत्त्व समजून घे. तुला फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे,' असे हुमाने म्हटले आहे. त्यांनी दिलेला सल्ला मला खूप भावला. तो मी लिहून ठेवला आणि त्याची अंमलबजावणीही केली. इतर अभिनेत्रींप्रमाणे मी कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. नाकाची शस्त्रक्रिया करताना  हनुवटीची रचना बदलते. त्यामुळे अभिनेत्रींना त्यांच्या मूळ रूपातच स्वीकारले पाहिजे, असेही हुमाने नमूद केले.