EVM मशीनच बंद पडले ; दोन तास मतदार ताटकळले
नांदगाव मतदार संघातील प्रकार
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 11:22:59
नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकसाठी आज, दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपासून नाशिक जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली आणि EVM मशीनच बंद पडले आहे.
नांदगाव मतदारसंघातील १६४ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन तब्बल दोनदा बंद पडले आहे. न्यू. इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावरील हा प्रकार घडला आहे. मतदार तब्बल दोन तासांपासून मतदानासाठी ताटकळत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. मतदारांच्या बोटाला शाई लावली असून मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने मतदारांना आपला हक्क बजावता आलेला नाही. यामुळे निवडणूक आयोगाचा गलथान कारभार समोर आला आहे.
दरम्यान, नांदगाव विधानसभेसाठी १ लाख ७८ हजार६०० पुरुष व १ लाख ६४ हजार ४५२ स्री, अन्य ४ असे एकूण ३ लाख ४५ हजार ५६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क ३४१ मतदान केंद्रांवर बजावणार आहे.