नेरुळमध्ये सापडले इंटरनेट राऊटर व हँकिंगचं सामान

धुळ्यात सापडल्या चांदीच्या विटा

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 12:40:25

विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया अपडेट्‌स   

  • नवी मुंबईतील नेरुळमध्ये गाडीत सापडले  इंटरनेट  राऊटर व  हँकिंगचं सामान ;  
  • शिवाजीनगर मतदान केंद्रावरील प्रकारधुळ्यात ९४ कोटी ६८ लाखांच्या चांदीच्या विटा सापडल्याने खळबळ
  •  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदवलं असून पहिल्या दोन तासात त्या ठिकाणी 8.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
  • मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे  समरजितसिंह घाटगे यांनी कागल विधानसभा मतदारसंघांत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.
  •  शरद पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्योतिषी नाही, पण जनतेला परिवर्तन हवे आहे, याची खात्री असल्याचा केला दावा. 
  • विधानसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसून येत आहे.   सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. दुपारनंतर उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळीच गर्दी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी होते.  
  •  दरम्यान झारखंड विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत सकाळी ११ पर्यंत महाराष्ट्राच्या दीडपट मतदान झाले आहे.