विचारपूर्वक मतदान करा
सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 13:24:50
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज दि.२० नोव्हेंबर रोजी सकाळी सातपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. एक जबाबदार व सुजाण नागरिक म्हणून कलाकार, क्रिकेटपटू तसेच अन्य सेलिब्रेटींनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, राजकीय नेते, उमेदवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांनाही मतदान करण्याचे, आपल्या मताचे महत्व ओळखण्याचे आवाहन केले.
नाशिक पूर्व मतदार संघातील भाजपा माहितीचे उमेदवार राहुल ढिकले , नांदगाव अपक्ष उमेदवार समीर भुजबळ , नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, देवयानी फरांदे यांनी सकाळच्या सत्रात मतदान केले.
तर मुंबईत बॉलिवूड कलाकार, मराठी चित्रपट कलाकार, क्रिकेटपटूंनी देखील सकाळच्या सत्रात मतदान केले.अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अक्षय कुमार, फरहान अख्तर, रितेश देशमुख आणि जेनिलीया यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदानं केले. मला माझ्या मताची किंमत आहे, तुम्हाला असेल तर घराबाहेर पडा आणि मतदान करा असे आवाहन अभिनेता सुबोध भावे याने मतदान केल्यानंतर केले. तर परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. पण, त्यातही घरच्यांशी सुजाण नागरिकांशी चर्चा करा, विचारपूर्वक येऊन मतदान नक्की करा असे आवाहन ज्युनियर सोनाली कुलकर्णी हिने केले.
दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी कुमार अभिनेता अक्षय कुमार, निवडणूक आयोगाचा ब्रॅण्ड ॲम्बॅसेडर सचिन तेडुलकर, सारा तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सलीम खान, अभिनेता राजकुमार राव, कबीर खान, जॉन अब्राहम, गौतमी कपूर, कार्तिक आर्यन, सुनील शेट्टी, विशाल दादलानी, सोनू सूद, अली फजल, हेमा मालिनी, इशा देओल , परेश रावल, रकुल प्रीत, जॅकी भगनानी, गुलजार, मेघना गुलजार, सुनीता आहुजा , सोहा अली खान, अजिंक्य रहाणे , बोमन इराणी, अनुपम खेर, कैलाश खेर, सुभाष घई यांनी मतदानाचा हक्क बजावला.