आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या ;शर्मिला पवारांचा आरोप

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 14:59:18

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -२०२४ ताज्या घडामोडी 

  • आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या देण्यात आल्या ;शर्मिला पवारांचा आरोप 
  • मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीपचे वाटप ; अजित-शरद पवार गटात जुंपली
  • नागपुरात काही मतदान केंद्रात इव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे अडीच तासांपर्यंत मतदान थांबले होते.
  • निवडणूक आयोगाने   पुरेशी तयारी न करताच निवडणूक घेतली, वेळेवर पोलिंग अधिकारी बदलले आहे. तर अनेक मतदारांचे नाव मतदार यादीतून डिलीटेड आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती  - काँग्रेस नेते नितीन राऊत यांचा आरोप
  • आयोगाची ही सिस्टीम बरोबर नाही, सिस्टीम फुल प्रूफ राहिली पाहिजे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मतदानानंतर नाराजी
  • अजित पवार, नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नारायण राणे, धीरज देशमुख, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, आशिष शेलार, अमोल कोल्हे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, प्रकाश आंबेडकर, उदयनराजे भोसले यांसह प्रमुख नेत्यांचे सहकुटुंब मतदान