राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप

रोहित पवारांनी केला व्हिडिओ शेअर

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 18:08:04

 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -२०२४ अपडेट्‌स

  • विधानसभा निवडणुकीत मतदान केल्यावर लावण्यात येणारी ओळख शाई पाण्याने धुतली असता, पुसट होत असल्याच्या तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. ठाणे जिल्हा विधानसभा मतदारसंघातील कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, अंबरनाथ, नवी मुंबई आणि मुरबाड मतदारसंघातील अनेक मतदारांच्या बोटावरील शाई पुसट झाल्याची बाब मतदारांनी निदर्शनास आणून दिली. 
  • अनेक मतदारसंघात वादावादी, ईव्हीएममध्ये बिघाड आणि  तत्सम घटना समोर येत आहेत. रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसेवाटप केल्याचा आरोप करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
  • हर एक ने मतदान करना चाहिए , ये अपने अस्तित्व की निशानी हैं  असे कॅप्शन नाना पाटेकर यांनी मतदान केल्यानंतर पोस्ट केलेल्या फोटोला दिले आहे. 
  • वडगाव शेरी खराडी भागात महिला मतदारांनी फेटे परिधान करून मतदानाचा हक्क बजावला.
  • काही मतदान केंद्राबाहेर सेल्फी काढण्यासाठी व्यवस्था केली होती.
  • काही मतदान केंद्रावर फळ्यावर मतदारांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आकर्षक पेपर ट्री संकल्पना राबविण्यात आली. 
  •    वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गटाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण करण्यात आल्याचा  एक व्हिडिओ  समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे.
  • गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे ६२.९९ टक्के मतदान झालं आहे. तर ठाण्यामध्ये सर्वात कमी म्हणजे ३८.९४ तर मुंबई शहरात ३९.३४  टक्के मतदान झालं.