राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-20 18:34:49
मुंबई: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.राज्यात मतदानासाठीची अधिकृत वेळ संपली असली तरी ६ वाजेपर्यंत रांगेत असलेल्या सर्वांचे मतदान होण्याची शक्यता आहे. आजची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २८८ मतदारसंघांच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ६१.९५टक्के, अकोला - ५६.१६ टक्के, अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड - ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के,धुळे - ५९.७५ टक्के, गडचिरोली-६९.६३ टक्के, गोंदिया -६५.०९ टक्के, हिंगोली - ६१.१८ टक्के, जळगाव - ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के,लातूर _ ६१.४३ टक्के, मुंबई शहर- ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,नागपूर - ५६.०६ टक्के,नांदेड - ५५.८८ टक्के, नंदुरबार- ६३.७२ टक्के,नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, पालघर- ५९.३१ टक्के, परभणी- ६२.७३ टक्के,पुणे - ५४.०९ टक्के,रायगड - ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के,सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,सोलापूर -५७.०९ टक्के,ठाणे - ४९.७६ टक्के, वर्धा - ६३.५० टक्के,वाशिम -५७.४२ टक्के,यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.