महायुतीला १६४ जागा तर मविआला १०० जागा
भाजपच्या बुथ लेव्हल एक्झिट पोलचा अंदाज
Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-21 15:08:42
मुंबई :- भाजपच्या बुथ लेव्हल एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, विधानसभा निवडणुकीत महायुतीला १६४ जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या १०० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्ष व इतर उमेदवारांना २४ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.राज्यात बुधवारी मतदान संपल्यानंतर भाजपने बुथ लेव्हलवरुन माहिती गोळा केली होती
महायुतीमध्ये भाजपला १००, शिंदे गटाला ४२ आणि अजितदादा गटाला २२ जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला ४०, शरद पवार गटाला ३५ आणि उद्धव ठाकरे गटाला २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल 61.13 टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा राज्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. अंतिम आकडेवारीनुसार मतदानाची ही टक्केवारी ६६ ते ६८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे.
दरम्यान, जेव्हा जेव्हा मतदानाचा टक्का वाढला आहे, तेव्हा त्याचा फायदा आम्हाला झाला आहे. असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर दुसरीकडे मतदानाचा वाढलेला टक्का परिवर्तनाची नांदी असल्याचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना वाटतेय. त्यामुळे आता नेमका कोणाचा अंदाज खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तूर्तास एक्झिट पोलनुसार महायुतीच सत्तारुढ होण्याचा अ