आराध्याचा वाढदिवस; अभिषेकची पाठ

अमिताभनेही दिल्या नाहीत शुभेच्छा

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-22 14:22:50

ऐश्वर्या राय- अभिषेक या स्टार कपलच्या नात्याचे स्टेटस अजूनही गुलदस्त्यात आहे. निम्रत कौरसोबतच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा खऱ्या की खोट्या, घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या याचा थांगपत्ताही दोघे लागू देत नाहीत. मात्र, दोघांमध्ये नक्कीच आलबेल नाही, याची पुष्टी करणाऱ्यादेखील अनेक बाबी समोर येताहेत. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, आराध्या बच्चनचा वाढदिवस. ऐश्वर्याच्या वाढदिवसाला अभिषेक हजर नव्हता. तो भोपाळमध्ये होता. हे त्याचे कारण समजू शकते. मात्र, आराध्याच्या, आपल्या लेकीच्या वाढदिवसालादेखील अभिषेक उपस्थित नव्हता. त्याने फक्त सोशल मिडियावर आराध्याला शुभेच्छा देऊन वेळ मारुन नेली आहे. तिकडे अमिताभ यांनी तर सोशल मिडियावर देखील आराध्याला बर्थ डे विश करणे टाळले.   आराध्याचा १३ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. यानिमित्त ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाच्या फोटोंची झलक तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात कुठेच अभिषेक बच्चन दिसत नाही. दरम्यान, तू आज ऑफिशियली टीन एजर झाली आहेस, अशा शब्दांत ऐश्वर्याने आराध्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, आराध्याचा वाढदिवस तिच्या आईच्या घरी साजरा केला. कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला. आराध्याला तिने आजोबांच्या फोटोला नमस्कार करायला लावून आशीर्वाद घ्यायला सांगितले. या फोटोला ऐश्वर्याने माझ्या आयुष्यातील दोन प्रेम, पापा आणि माझी प्रिय आराध्या यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझं हृदय, माझा आत्मा...असे  कॅप्शन दिले आहे. पण आपल्या लेकीच्या, नातीच्या वाढदिवसाला अभिषेक, जया, अमिताभ असे बच्चन कुटुंबातील कोणीच उपस्थित नसल्याने पुन्हा एकदा आता ऐश-अभिच्या घटस्फोटासंदर्भात भुवया उंचावल्या आहेत. अभि-ऐशच्या नात्यातील कटूता यामुळे वारंवार समोर येत आहे.