बोरसे, कोकाटे, आहेर आघाडीवर

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-23 13:10:44

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणी अपडेट्‌स

बागलाण विधानसभा मतदार संघ

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दिपीका चव्हाण यांना 12 व्या फेरी अखेर 1454मते मिळाली आहेत तर भाजपाचे उमेदवार दिलीप बोरसे यांना 6536मते मिळाली आहेत. 
दिपीका चव्हाण यांना एकूण मते 15हजार 885मते मिळाली आहे तर दिलीप बोरसे यांना 93246 मते मिळाली आहेत. 
विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांना 12 व्या फेरी अखेर 77361मतांची आघाडी मिळवून विजयी आघाडी घेतली आहे.

देवळा विधानसभा मतदार संघ

 तालुक्यातून आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना 27 हजार 539 मतांची आघाडी मिळाली. एकूण मते त्यांना 53 हजार 709 मते पडली. शिरीष कुमार कोतवाल यांना 2477 मते पडली. गणेश निंबाळकर यांना 5679 मते पडली. केदा आहेर यांना 26,170 मते मिळाली. देवळा तालुक्यातील मतमोजणी आता संपली असून यापुढे चांदवडची मतमोजणी सुरू होईल. चांदवडच्या 14 फेऱ्या बाकी आहेत. 

सिन्नर विधानसभा मतदारसंघ
22 वी फेरी अखेर एकूण मते
उदय सांगळे (शरद पवार गट)  87201
आ. माणिकराव कोकाटे (अजितपवार गट) 128317
आमदार कोकाटे आघाडी 41116