ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वांत महागडा खेळाडू

लखनौ सुपर जायंट्सने घेतले २७ कोटी रुपयांना विकत

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-11-25 13:10:38

मुंबई : ऋषभ पंत याने आयपीएल लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. 

  विशेष म्हणजे, आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला.  दिल्ली कॅपिटल्सने त्याला घेण्याचा प्रयत्न केला, पण लखनौने लगेचच त्यांची रक्कम वाढवली. मग दिल्लीने आपले हात मागे घेतले. अशाप्रकारे लखनौने ऋषभ पंतला २७ कोटींमध्ये घेतले.

लखनौ, हैदराबादमध्ये चुरस

ऋषभ पंतसाठी लखनौ आणि आरसीबी यांच्यात सुरुवातीला चुरस रंगली होती. पंत २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत १० कोटींच्या पुढे गेली होती. यादरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाले, पण लखनौनेही हार मानली नाही.