महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी तयार

डॉ. गावित, मुनगंटीवार, सत्तार, केसरकरांना डच्चू?

Written by लोकनामा ऑनलाईन राजकीय 2024-11-28 12:42:58

मुंबई : विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरही महायुतीत चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाचा अंदाजे फॉर्म्युला २१, १२, १० असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला १० ते १२ आणि राष्ट्रवादीला सात ते नऊ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. या प्राथमिक वाटाघाटी असल्याचे सांगण्यात येते. याचदरम्यान भाजप, शिवसेना शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. 

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे

गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा शिवेंद्रसिंहराजे भोसले, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा गणेश नाईक, ओबीसी व मराठवाड्यातील चेहरा पंकजा मुंडे, धनगर समाजाचा चेहरा गोपीचंद पडळकर. नव्या मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार यांचा डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य नावे

उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, नीलेश राणे. नव्या मंत्रिमंडळात दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाची संभाव्य नावे

अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम.