प्रियांका गांधी यांची संविधान घेऊन शपथ

भावालाही नमस्कार, रवींद्र चव्हाणांचा मराठी शिरस्ता

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-29 13:02:20

नवी दिल्ली : प्रियांका गांधी-वध्रा यांनी वायनाड (केरळ) येथून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत प्रचंड मतांनी त्या विजयी झाल्या. यासोबतच नांदेडमधून लोकसभेची पोटनिवडणूक रवींद्र चव्हाण यांनी लढवली. तेदेखील निवडून आले. प्रियांका गांधी, रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून गुरुवारी (दि. २८) शपथ घेतली. प्रियांका यांनी हातात संविधान घेऊन शपथ घेतली. त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ हिंदीतून घेतली.
     विशेष म्हणजे, प्रियांका गांधी यांनी हातात संविधान घेऊन शपथ घेतली. भाऊ राहुल गांधी यांना यावेळी नमस्कार करतानाही त्या दिसल्या. रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून मराठीतून शपथ घेतली. रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांचा पराभव केला. वायनाड (केरळ) लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी यांना सहा लाख २२ हजार मते मिळाली आहेत.