सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला
सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर ट्रेंड बदलला
Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-11-29 13:10:03
मुंबई: भारतीय शेअर बाजार गुरुवारी (दि. २८) बंद होताना घसरणीसह बंद झाला. शेअर बाजारात घसरण होईल, अशी अपेक्षा अनेकांना नव्हती. मात्र, मोठ्या प्रमाणात घसरणीचे सत्र पाहायला मिळाले. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही घसरणीसह बंद झाले.
सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर ट्रेंड बदलल्याचे दिसले. बँकिंग व आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये घरसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये १२०० अंकांनी घसरण झाली, तर निफ्टी २४ हजारांपेक्षा खाली बंद झाला. सेन्सेक्स व निफ्टी जवळपास १.५ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशाकांत घसरण झाली. बीएसईवर सेन्सेक्स ११९०.३४ अंकाच्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्समध्ये १.४८ घसरण पाहायला मिळाली, तो ७९०४३ वर बंद झाला. एनएसईवर निफ्टी ३६०.७५ अंकांनी म्हणजेच १.४९ टक्क्यांनी घसरून २३९१४ वर बंद झाल्याचे पाहायला मिळते.
सेन्सेक्समध्ये ज्या कंपन्यांचे स्टॉक्स घसरले त्यात इन्फोसिसचा समावेश आहे. इन्फोसिसचे शेअर्स ३.४६ टक्क्यांनी घसरले. एम अँड एम, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, अदानी पोर्टस, टेक महिंद्रा कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्सवरील ३० कंपन्यांपैकी केवळ एका कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. स्टेट बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टी ५० वर केवळ चार कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली, तर ४६ शेअर्स घसरले. एसबीआय, श्रीराम फायनान्स आणि सिप्ला कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. निफ्टीवर एसबीआय लाइफच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. या कंपनीचा शेअर ५.४१ टक्क्यांनी घसरला. एचडीएफसी लाइफ, एम अँड एम, इन्फोसिस, अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
अमेरिका कनेक्शनचा परिणाम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे. ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको व चीनवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका याशिवाय व्याजदरात कपातदेखील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावर परिणाम झाला.