'सिंगल लाइफचा खूप आनंद घेतोय'

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-11-29 15:33:23

कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' अशा अनेक चित्रपटांतून प्रेमासारख्या हळुवार नात्याची गुंफण करणारा दिग्दर्शक करण जोहर त्याच्या आयुष्यात मात्र प्रेमाला पारखाच राहिला. अनेक अफवा, चर्चा यासंदर्भात झाल्या. मात्र, करणने यापासून दूर जात त्याच्या कामावर लक्ष दिले. सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचा तो वडील बनला. त्यांच्या मुलाचे नाव यश व मुलीचे नाव रुही आहे. दरम्यान, आयुष्याची पन्नाशी गाठलेल्या करणने आता मात्र त्याचे मौन सोडले आहे. त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल त्याने म्हटले आहे की, मी वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत जोडीदाराच्या शोधात होतो, पण पन्नाशीनंतर मी हा शोध घेणे बंद केले. मी सिंगल आहे आणि बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये नाही. मी माझ्या आयुष्यात सिंगल लाइफचा खूप आनंद घेतोय. मला नाही वाटत की, आता माझं आयुष्य मी कुणासोबत शेअर करू शकेन. माझ्या मुलांची जबाबदारी व आईची जबाबदारी पेलणे आता एवढंच करायचं आहे.