आंध्रात वक्फ बोर्ड बरखास्त

नायडू सरकारचा मोठा निर्णय

Written by लोकनामा ऑनलाईन देश-विदेश 2024-12-02 13:22:58

हैदराबाद : केंद्रातील 'एनडीए'चा घटक असलेल्या आंध्र प्रदेशातील नायडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चंद्राबाबू नायडू सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केले आहे. 

मागील जगनमोहन रेड्डी सरकारने राज्यात वक्फ बोर्डाची स्थापना केली होती. मात्र, यंदा निवडणुकीत आंध्र प्रदेशमधील जनतेने नायडू यांच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर नायडू सरकारने हा निर्णय घेत राज्यातील वक्फ बोर्ड रद्द केले आहे. राज्याचे कायदा व अल्पसंख्याकमंत्री एन. मोहम्मद फारुक यांनी सांगितले की, वक्फ बोर्ड रद्द केल्याचा निर्णय शनिवारीच जारी केला आहे. त्यामुळे नायडू सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वक्फ बोर्ड रद्द केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकार आता एक नवीन बोर्ड स्थापणार आहे. नायडू सरकारने रेड्डी सरकारच्या काळात जारी केलेले जीओ-४७ रद्द करून, जीओ-७५ जारी केले आहे. हा नियम परत घेण्यामागे अनेक कारणे आहे. त्यांपैकी काही कारणे समोर आली आहेत. वक्फ बोर्ड रद्द करण्याची अनेक कारणे देण्यात आली आहेत.