प्रमोद जुमडे यांचे मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण

नाशिकचे नाव आता कास्टिंग क्षेत्रात

Written by लोकनामा ऑनलाईन मनोरंजन 2024-12-04 15:52:44

नाशिक : नाशिकच्या मातीत कलावंतांची खाण आहे, असं म्हटलं जातं. नाटक असो की चित्रपट येथील तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अभिनेते यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यादीत आता युवा लेखक, कास्टिंग दिग्दर्शक व निर्मिती नियंत्रक म्हणून श्री शिव गोविंदा एंटरटेन्मेंटचे प्रमोद जुमडे यांचा समावेश झाला असून, मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत ‘श्री गणेशा’ चित्रपटासाठी निर्मिती नियंत्रक कास्टिंग डिरेक्टर म्हणून जबादारी पार पाडली आहे.
      दिग्दर्शक मिलिंद कवडे यांचा आगामी सिनेमा अर्थात श्री गणेशा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रमोद जुमडे यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. विशेष म्हणजे, या चित्रपटात नाशिकमधील अनेक कलावंताच्या भूमिकादेखील आहेत. बँड फिल्मस, लघुपट, बेबसीरिज, अल्बम साँगच्या प्रदीर्घ अनुभवानंतर प्रमोद जुमडे यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे.
             दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी पहिल्यांदाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला आहे. हा सिनेमा २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रथमेश परब, संजय नार्वेकर, शशांक शेंडे, मेघा शिंदे, अंजली जोगळेकर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नात्यांची एक वेगळी गुंफण या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले व कांचन संजय भोसले यांनी केली असून, सहनिर्माता रवी माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले आहेत. कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा व संवाद लेखन संजय नवगोरे वांचे आहे. सिनेमॅटोग्राफी हजरत रोख वली यांची आहे. गीतकार जय अग्रे आणि मंदार चोळकर असून संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगतार यांचे असून, संकलन गुरू पाटील यांनी केले आहे. कलादिग्दर्शक सुमित पाटील व नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दीपक एस. कुदळे, दिनकर पंडित कार्यकारी निर्माता असून, सहदिग्दर्शन विनोद शिंदे यांनी कले आहे. मुंबई, पुणे, नाशिकचे त्रिकुट असलेला नवा श्रीगणेशा प्रेक्षकांना आवडेल अशी आशा प्रमोद जुमडे यांनी व्यक्त केली आहे.